आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०१९ लोकसभा निवडणुका तोंडावर असताना शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये पेन्शन जाहीर केली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी तत्परतेने जिल्हानिहाय याद्या करून राज्यातील १ कोटी १० लाख शेतकऱ्यांच्या नावावर २२०४ कोटी रुपये जमा करण्यात आले. परंतु ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या नावे जमा झाला तेव्हा शेतकऱ्यांची संख्या तब्बल ९७ लाखांनी कमी होत फक्त १७ लाख ४ हजार राहिली आहे. एवढ्याच शेतकऱ्यांच्या नावे तेव्हा ३४० कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित लाभार्थी गेले कुठे, या प्रश्नाचे उत्तर शासनस्तरावर कुणाकडेच नाही.
अपात्र शेतकऱ्यांची संख्या कमी केली तर ८३ लाख शेतकऱ्यांना पेन्शन मिळायला हवे. ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या २० लाख व अपात्र शेतकऱ्यांची संख्या १० लाख गृहीत धरली असता ६३ लाख शेतकऱ्यांना पेन्शन जमा झाली नाही. कृषी विभागाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १० लाख ४० हजार शेतकरी अपात्र ठरले. त्यांच्या खात्यावर १०९७ कोटी ६९ लाख जमा झाले होते. त्यापैकी १ लाख ६९२ शेतकऱ्यांनी ८९.९२ कोटी वसूल करण्यात आले आहेत. कृषी विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १.०२ कोटी शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत. यापैकी १.५१ कोटी शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे, तर ८१ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. अद्याप २० लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.