आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:पूर्वी पक्षात शब्दाला किंमत होती, आता कुणीच विचारत नाही - सुशीलकुमार शिंदे; काँग्रेस पक्षात नेत्यांच्या मनात वेगळीच खंत, नकोशा वेदना

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पटोलेंचे केले होते स्वागत, रोख दिल्लीकडेच?

काँग्रेस पक्षात पूर्वी विचारमंथन व्हायचे, चुकीच्या धाेरणात दुरुस्त्या व्हायच्या...पण आता काेणी विचारतच नाही. वैचारिक परंपरा राहिली नाही. त्यामुळे आपण सध्या कुठे आहाेत असा प्रश्न पडताे. पूर्वी शब्दालाही पक्षात किंमत हाेती, आता आहे की नाही, माहिती नाही, अशी खंत व्यक्त करत माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सध्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर नेमकेपणाने बाेट ठेवले. त्यांनी जाहीरपणे मांडलेल्या या नाराजीचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या अमृतमहाेत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमात शिंदे यांनी हे वक्तव्य केले. या वेळी काँग्रेसमधून भाजपत गेले हर्षवर्धन पाटील उपस्थित हाेते हे विशेष. रत्नाकर महाजन हेही ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यसभेवर घेतले जावे यासाठी मी शब्द टाकेन, पण पक्षात माझ्या शब्दालाही किती किंमत आहे की नाही हेही मला माहीत नाही, असे शिंदे म्हणाले.

शंकरराव पाटील यांचा संदर्भ
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहत शिंदे म्हणाले, “शंकरराव बाजीराव पाटील यांच्या काळात (१९७४-७५) पक्षात वैचारिक शिबिरे हाेत. शिबिरांची गरज आणि शब्दाला काय किंमत हाेती हे त्यांना माहिती हाेते. त्यातून विचारमंथन व्हायचे. आज ते हाेत नाही याचे दु:ख हाेते. आज आम्ही कुठे आहाेत हे पाहणेही कठीण झाले आहे.’

पटोलेंचे केले होते स्वागत, रोख दिल्लीकडेच?
शिंदे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जाेरदार चर्चा आहे. याच व्यासपीठावर भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटीलही हाेते. सध्या काँग्रेस पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीपासून वेगळे राहून स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू पाहत अाहे. शिंदे यांनी एका कार्यक्रमात नाना पटाेले यांच्या धाडसी कामाचे नुकतेच काैतुक केले हाेते. त्यामुळे काँग्रेसच्या धोरणांबाबत आता त्यांचा राेख दिल्लीतील नेत्यांवर असल्याची चर्चा अाहे.


बातम्या आणखी आहेत...