आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:तीन दिवसांत 280 जणांना मिळाले दिव्यांग दाखले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त सिव्हिल रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय शिबिरात फक्त २८० जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केले आहे. या सेवा शिबिरास अल्प प्रतिसाद मिळाला आहे.शासनाकडून किमान ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. बहुतांश दिव्यांग बांधव अपंगत्व ४० टक्क्यांहून कमी असल्यास प्रमाणपत्र किंवा दाखले घेत नाहीत. १० सप्टेंबरपूर्वी कागदपत्रे तपासणी केलेल्या दिव्यांगांनी प्रलंबित प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी उपस्थित राहून सेवा पंधरवड्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

स्वावलंबन डॉट कॉम या पोर्टलवर अनेकांनी नोंदणी केली होती. नोंदणी करणाऱ्याचे प्रमाण हजारोंच्या घरात आहे. यामध्ये अनेकांनी तीन ते चार वेळा अर्ज केलेले दिसून आलेले आहेत. नोंदणीची संख्या जास्त वाटत असली तरी प्रत्यक्षात लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. सिव्हिलमधील दिव्यांग खिडकी नोंदणी करून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रे तपासणी करण्याची सोय केली होती. सप्टेंबरमध्येही शिबिर घेण्यात आले होते. त्यासही कमी प्रतिसाद मिळाला होता. तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाते.

बातम्या आणखी आहेत...