आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ दोनच महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली. नव्या वर्षात ५६ हजार ४०० रुपये दहा ग्रॅम (२४ कॅरेट) या उच्चांकी दराची नोंद बुधवारी (ता. ४) झाली. दुसऱ्या दिवशी त्यात ६०० रुपयांची घसरण झाली. परंतु दर स्थिर राहणार नाही, वाढतच जाणार असल्याचे संकेत सराफ व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
मागील वर्षी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी ५० हजार ७०० रुपये असा सोन्याचा दर होता. त्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत त्याचा आलेख चढताच राहिला. नव्या वर्षात त्याने उच्चांकच गाठला. संक्रांती पर्वावर सोन्याला मागणी नसते. त्यानंतरच्या विवाह मुहूर्तांवर मागणी वाढते. त्यामुळे सोन्याच्या दरातील ही वाढ स्थिर राहणार नाही. वाढतच जाणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा जानेवारीअखेरपासूनच लग्नसराईला सुरुवात होईल. मेअखेरपर्यंत मुहूर्त आहेत. चांदीच्या दरातही वाढ सुरूच आहे. गुरुवारी चांदीचे दर ६९ हजार ५०० रुपये होते.
दर वाढले तरी मागणीत घट नाही
मागील दोन महिन्यातील सोन्याच्या दराचा आलेख पाहिला तर चढताच राहिलेला आहे. त्यामुळे मागणीत घट झालेली नाही. उलट गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे आेढा असणाऱ्यांची संख्या वाढली. सतत वाढत असणारा दर कुठे तरी थांबतो आणि स्थिर राहतो. जानेवारीअखेरपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.' - प्रदीप भोळा, सराफ व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.