आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:उत्तर तालुक्यामध्ये मुलींनीच मारली बाजी ; तीन महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या निकालात उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये मुलींनीच बाजी मारली. भोगाव येथील नालंदा महाविद्यालय विज्ञान शाखा, वडाळा येथील न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कला शाखा, रानमसले येथील ब्रह्म गायत्री कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडाळा, विज्ञान शाखेत वैष्णवी लक्ष्मणराव पाटील ९४.५० टक्के, रिद्धी रवींद्र साठे ९०.१७ आणि अमेय यदुनाथ चिद्रेवार ९०.१७ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत अमृता जाधव ८२.१७, धनश्री लहू तानवडे ८२, साक्षी सुरेश पाटील ७९.८३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. श्री ब्रह्मागायत्री विद्यामंदिर (कृषी) व कनिष्ठ महाविद्यालय, रानमसले येथे सुहाना सिकंदर शेख ८१ टक्के, प्रीती पांडुरंग बोराडे ७७.६७, प्रियंका भारत गोरे ७६.५० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. बीबी दारफाळ येथील गणेश कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यालयाचा निकाल ९७.३३ टक्के लागला. प्रांजली भारत सुतार ७५, वर्षा शिवाजी हरदाडे ७४, मोनिका महादेव साळुंखे हिने ७४ टक्के गुण मिळवून यश मिळवले. नालंदा महाविद्यालयातील विज्ञान शाखेत पृथ्वीराज पवार ८७.६०, सुप्रिया सुशील चंदनशिव व श्रेयस दादासाहेब कसबे यांना ७४.८३ तर पौर्णिमा लक्ष्मण चौगुले हिने ७३.५ टक्के गुण मिळवले. कला शाखेत वर्षा संजय रणदिवे हिला ७०.३३, प्रज्ञा अनिल क्षीरसागर ६७.५०, चाँदहुसेन शेख ६२.९३ टक्के गुण मिळाले. महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेत स्नेहल अशोक महापुरे ८३.१७, निकिता महादेव धुमाळ ८२.५०, श्रद्धा नाना बोराडे ८१.६७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

बातम्या आणखी आहेत...