आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र कचऱ्याचे ढीग:विडी घरकुलमध्ये घंटागाड्यांचे नियोजन बिघडले; मक्तेदाराकडून कचरा उचललाही जात नाही

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने विडी घरकुल बी ग्रुप परिसरात घंटागाडी येण्याचे नियोजन नसल्यामुळे लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. कचरा कुजून सर्वत्र घाण पसरली आहे. घंटागाडी रोज येण्याऐवजी दर सहा दिवसाला किंवा पाच दिवसाला घंटागाडी येत आहे. त्यामुळे लोक घरात पाच-पाच दिवसांचा कचरा साठवून ठेवू शकत नाही. म्हणून पूर्वी ज्या ठिकाणी उकिरडे होते त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. पूर्वी कचरा कुंडीच्या अवतीभवती भिंत तरी असायची.

ती नसल्याने कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. तो पावसाने कुजून दुर्गंधी पसरत आहे. या त्रासाला कंटाळून नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांना अडचणी सांगितल्या. तरीसुद्धा कुठेही त्यांचे म्हणणं ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांतून राग व्यक्त केला जात आहे. म्हाडा विहिरीच्या बाजूला निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनर आणून ठेवण्यात आला होता. तोही कचऱ्याने भरून कचरा खाली पडत आहे. रस्त्यावर टाकलेला कचरा आणि हा कंटेनरमधील कचरा दोन्हीही महापालिकेने उचललेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...