आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:महसूल भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर रोजी लोकार्पण

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२००९ मध्ये भूमिपूजन झालेले आणि २०१४ रोजी बांधकाम पूर्ण झालेल्या महसूल भवन अखेर पूर्णत्वास गेले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या पाठपुराव्यामुळे इमारत, फर्निचर व विद्युतीकरणचे काम पूर्ण झाले आहे. ६ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण करण्याचे नियाेजन अाहे. याशिवाय शहरातील विविध कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप प्रशासनाकडून दौरा अंतिम झाला नसून दाेन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तीन सरकार, सात पालकमंत्री व सहा जिल्हाधिकारी बदलून गेले. पण महसूल भवन अपूर्णच होते. शासनाकडून पुरेसा निधी न मिळाल्याने काम रखडले होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला. १५ ऑगस्टनंतर इमारतीचे लोकार्पण करायचे होते, पण पालकमंत्री नसल्याने तो मुहूर्त चुकला. आता ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आता महसूल भवन म्हणून ओळखले जाईल.