आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी - पालकांची दगदग टळणार:एकाच अर्जात उत्पन्न, रहिवास, जात, नाॅन-क्रिमिलेअर दाखले‎

सोलापूर‎ / विठ्ठल सुतार13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी विविध दाखले‎ काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची सेतू व महा ई सेवा ‎ ‎ केंद्रात मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि ‎ ‎ पालक व विद्यार्थ्यांचा वेळ वाचविण्यासाठी आता‎ एकाच अर्जाद्वारे सर्वप्रकारचे दाखले देण्यावर‎ सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत लवकरच‎ अंतिम निर्णय घेऊन जूनपासूनच याची अंमलबजावणी ‎ ‎ करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी‎ सांगितले. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना एकच अर्ज ‎ ‎ करावा लागणार आहे. यापूर्वी प्रत्येक दाखल्यासाठी‎ स्वतंत्र अर्ज करावा लागत होता.‎

विद्यार्थी - पालकांची दगदग टळणार : जून महिन्यापासून अंमलबजावणीची शक्यता, लोणी येथील महसूल परिषदेत झाली चर्चा‎ फेब्रुवारी महिन्यात लोणी येथे झालेल्या महसूल परिषदेत यावर‎ महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चा करण्यात आली‎ आहे. यावर शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्या‎ निर्णयाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी होईल. जून‎ महिन्यांपासून दाखल्यांसाठी होणारी गर्दी पाहता मे महिन्यातच तो‎ निर्णय होईल, असे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. दाखले‎ काढण्याच्या धावपळीत अनेकांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश‎ मिळत नाही. दाखले नसल्याने प्रवेशाची संधी हुकते. यामुळे‎ एकाच अर्जात सर्व दाखले देण्याचा निर्णय केला आहे.‎

अर्ज केल्यानंतर उत्पन्न दाखला व रहिवास दाखला यासाठी आधी ८‎ दिवस लागत होते. जातीचा दाखला आणि नॉन-क्रिमिलेअर‎ दाखल्यासाठी आधी १५ दिवस लागत होते, पण याचा कालावधी‎ सुद्धा कमी करण्यात येणार आहे. शिवाय अर्जातील त्रुटी वा हरकतीचा‎ कालावधी कमी करून कमी वेळेत दाखले देण्यात येणार आहेत.‎ आता ही सर्व यंत्रणा ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांना कमी वेळेत‎ दाखल मिळण्यास मदत होणार आहे. सेतू कार्यालयाबरोबरच ३ हजार‎ लोकसंख्येपेक्षा अधिक गावांमध्ये आपले सरकार केंद्रास राज्य‎ सरकारने परवानगी दिल्याने गावातच दाखले मिळणार आहेत.‎

पूर्वी दीड ते दोन महिने लागायचे‎‎ दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी उत्पन्न‎ दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला आणि‎ नाॅन-क्रिमिलेअर या प्रमाणपत्राची गरज असते, पण‎ प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत असल्याने सर्व‎ दाखल्यांसाठी दीड ते दोन महिने कालावधी लागतो.‎ यातच विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत हाेता. यामुळे आता‎ सर्व अर्जांसाठी एकच अर्ज करावा लागणार आहे.‎ त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर‎ मुदतीत दाखले वितरित करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...