आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:उजनी धरणातील पाणी इंदापूरला मिळाले; पालकमंत्री भरणे म्हणाले ही जुनीच योजना

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी धरणातून इंदापूरला पाणी दिले गेले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता हे पाणी जुन्या योजनेतून नेले असल्याचा दावा करून सोलापूरचे पाणी पळवणार नाही, असे सांगितले आहे. योजना जुनी असली तरी पाणी उजनीतूनच नेले आहे, याकडे सोलापूरकरांनी लक्ष वेधले आहे.

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी वाटप झालेले आहे. त्यामुळे सोलापूरच्या वाट्याचे पाणी इंदापूर तालुक्‍याला नेणार नाही. तसे झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे वक्तव्य करणारे पालकमंत्री भरणे यांनी शेवटी उजनीचे पाणी इंदापूरला नेले आहे. मग आता राजकीय संन्यास घेणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत. यावर पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला असता, हे पाणी आणि ते पाणी हे वेगवेगळे आहे, लाकडी-निंबोडी ही जुनी योजना आहे, असे म्हणून पालकमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले, सोलापूरकरांनी गैरसमज करू नये. असे आवाहनही केले. बचावात्मक उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळात अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उगम उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथून असून, पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील दहा गावातील ४३३७ हेक्टर व बारामती तालुक्यातील ७ गावांतील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

यासाठी ०.९० अब्ज घन फूट पाणी कुंभारगाव येथून उपसा करणे प्रस्तावित आहे. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंत्री भरणे यांची राजकीय कारकीर्द पणास लावली होती. शेवटी उजनीतून पाणी नेऊन आपले राजकीय वर्चस्व बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...