आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण माघार:लेखी आश्वासनानंतर प्रहार संघटनेचे बेमुदत उपोषण मागे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. मंगळवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी लेखी हमी दिल्यानंतर शिक्षकांनी उपोषण माघार घेतले, अशी माहिती संघटनेचे सुजित काटमोरे यांनी दिली.

माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणारे व माहिती देण्यास दिरंगाई करणे, कार्यालयात विलंबाने उपस्थित राहणारे लिपिक संजय बारबोले, संजय बाणूर, विजयकुमार रणदिवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या बदली करण्याबाबत शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच, शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सप्टेंबरच्या तिसऱ्या शुक्रवारी बैठक लावण्याचे आश्वासनही दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...