आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवोद्गार:शिक्षण व संशोधनात भारत चीनचे व्हावे अदान-प्रदान; चीनच्या शिष्टमंडळाची विद्यापीठ कॅम्पसला भेट

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास शनिवारी चीनच्या एका अभ्यासू शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस पाहून भारावून गेले. विद्यापीठ व कॅम्पसबद्दल ‘व्हेरी ब्युटीफूल’ असे गौरवोद्गार काढत शिक्षण व संशोधनांत भारत व चीनमध्ये आदान प्रदान होण्याची अपेक्षा यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी चीनच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. विद्यापीठाच्या अभ्यासक्रम व संशोधनाबद्दल माहिती दिली.या शिष्ट मंडळामध्ये चीनमधील इंटरनॅशनल इंजिनिअरिंगचे वरिष्ठ संचालक लू युवान किंग आणि त्यांचे दोन सहकारी त्यासोबत डॉ. कोटणीस मेमोरियल कमिटीचे चेअरमन डॉ. राजेंद्र जाधव, प्रा. हेमंत सामंत, पराग मेहराल, दिलीप कागडा, समीर कुंगुटकर आदींचा समावेश होता.

सामंजस्य करारासाठी उत्सुक: लू युवान किंग
चीनचे लू युवान किंग म्हणाले की, या विद्यापीठाचे कॅम्पस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निश्चितच अनुकूल आहे. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनसाठी दिलेली सेवा खूप मोठी आहे. मानवतेचे ते दूत असून आम्हासाठी ते आदरस्थानी आहेत. या पुढील काळात सोलापूर विद्यापीठातील आणि चीनमधील विद्यापीठात सामंजस्य करार करून शिक्षण व संबोधनाबाबत आदान-प्रदानाचा करार करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

बातम्या आणखी आहेत...