आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन रेड क्रॉस सोसायटी:सोलापूर शाखेत रक्त संकलनासाठी 80 लाखांची मोबाईल बस; उद्या होणार लोकार्पण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सोलापूर शाखा संचलित दमानी रक्तकेंद्रात रक्त संकलन करिता नवीन मोबाईल गाडी दाखल झाली आहे. या गाडीत रक्त संकलन करण्यासाठी सुसज्ज व्यवस्था असून रक्तदान करण्यासाठी विशिष 5 खुर्च्या कम बेड, 5 मॉनिटर्स, रक्त साठवण्यासाठी फ्रिज, विद्युत पुरवठा गेल्यास यूपीएस सिस्टम आदी सर्व काही या बसमध्ये आहे. ही गाडी सुमारे 80 लाखाची असून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, राष्ट्रीय शाखेने सोलापूर शाखेस भेट दिली आहे.

या गाडीचा लोकार्पण रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वा. चार पुतळा चौकात होईल. याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उद्योगपती प्रेमरतन दमाणी आदींच्या उपस्थित होईल अशी माहिती चैरमान डॉक्टर राजीव प्रधान यांनी दिली. याप्रसंगी मानद सचिव जयेश पटेल, सहसचिव खुशाल देढिया, संचालक गुरुलींग कांनुरकर, राजीव देसाई, संदीप जव्हेरी सह अमरजा थिटे उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी

दमानी रक्तपेढीच्या वतीने थैलीसीमिया आजार असलेल्या बालकांना मोफत रक्तघटक पुरवले जाते. गरजू आणि वंचित अशा दोनशे मुलांची नोंदणी या रक्तपेढीकडे झाली. त्यांना दरमहा दाखल करून घेऊन आवश्यक तो रक्त घटक तातडीने पुरवून उपचार केला जातो. त्याची सोय डफरीन चौकातील रक्तपेढीच्या दालनातच करण्यात आली आहे. रक्तपेढीच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक रक्तदाते स्वेच्छेने रक्त देण्यासाठी या पेढीत येतात. सामान्य रुग्णांना तातडीने रक्त देण्याची व्यवस्था आणि रक्तदात्यांना सुविधा देण्याबरोबरच रक्तदानासंदर्भातली चळवळ देखील या पिढीने सुरू केली.

मोबाईल व्हॅन गरजेची

रक्तदानासाठी नव्या मोबाईल व्हॅनमुळे रक्तदात्याच्या दारापर्यंत जाऊन संकलन करणे सुकर होईल. त्यांच्या वाढदिवसाला घरापर्यंत जाऊन कौटुंबिक सोहळा करता येईल. या दृष्टीनेदेखील ही मोबाईल व्हॅन गरजेची होती, असे डॉक्टर राजीव प्रधान म्हणाले. त्याचा प्रारंभ दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती दिनी होईल.

बातम्या आणखी आहेत...