आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इंद्रभुवन, प्रदर्शन स्थळ ; काम 15 दिवसांत पूर्ण

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात येत असलेल्या पालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीचे काम, मरिआई चौकाजवळील प्रदर्शन स्थळाचे काम १५ दिवसांत पुर्ण होईल तर इंदिरा गांधी स्टेडीयम येथील दुसऱ्या टप्प्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानुसार स्मार्ट सिटी कंपनी नियोजन करत आहे.सोलापूर महापालिका आवारातील ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण, मरिआई चौकात उभारण्यात येणाऱ्या प्रदर्शन स्थळ तसेच पार्क स्टेडियम येथील कामांची आढावा बैठक महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यात गुरुवारी झाली.

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने इंद्रभुवनचे नूतनीकरण करण्यात येत आहे. ते काम अंतिम टप्प्यात असून, पुढील १२ दिवसांत काम पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याचे नियोजन आहे. शिवाय मरिआई चौकात प्रदर्शन स्थळाचे काम सुरू आहे. तेथील काही जागेचा वाद न्यायालयात गेल्याने ती जागा सोडून इतर जागेवरील काम स्मार्ट सिटी कंपनीने पूर्णत्वास आणली आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी स्टेडियमचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून, पहिल्या टप्प्याचे काम करून ते महापालिकेस हस्तांतरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात जलतरण तलावसह इतर कामे करण्यात येत आहेत. जलतरण तलावाचे काम तांत्रिक असल्याने कामास विलंब लागत असून, पुढील दीड ते दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे. या तीन कामाबाबत पालिका आयुक्त तेली-उगले आणि ढेंगळे-पाटील यांच्यात चर्चा झाली.

तिन्ही कामे पूर्ण होतील
पालिका आयुक्तांसोबत इंद्रभुवन इमारत, स्टेडीयम आणि प्रदर्शन स्थळाच्या कामाबाबत चर्चा झाली. काम पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ित्रंबक ढेंगळे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

समांतर जलवाहिनीचे काम सुरू
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम लक्ष्मी इंजिनियरिंगला देण्यात आले असून, कंपनीने काम सुरू केले आहे. यापूर्वी अर्धवट राहिलेले काम सुरू करण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...