आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवा कंदील:तामलवाडी एमआयडीसीला उद्याेगमंत्र्यांचा हिरवा कंदील

साेलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूरपासून केवळ २० किलाेमीटर अंतरावर असलेल्या तामलवाडी (जि. उस्मानाबाद) येथे एमआयडीसीला उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दाखवला. ४०० एकरांवरील या आैद्याेगिक क्षेत्रात १० हजार राेजगार निर्मितीचे उद्दिष्ट घेण्यात आले. दक्षिण साेलापुरातील कुंभारी आणि मंद्रूप येथील नियाेजित एमआयडीसीचे बारा वाजले. त्यामुळे साेलापूरच्या नवउद्याेजकांना तामलवाडी एमआयडीसी खुणावत आहे.

उद्याेगमंत्री सामंत यांच्याकडे नुकतीच बैठक झाली. त्याला एमआयडीसीच्या लातूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित हाेते. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी जागेची पाहणीही केली. शेतकऱ्यांना चारपट मावेजा, गुंतवणूकदारांना सवलती : कटारे सूत गिरणीच्या परिसरातच विकसित हाेत असलेल्या या एमआयडीसीला जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत. त्यांना रेडीरेकनर दराच्या चारपट मावेजासह विकसित क्षेत्रातील १५ टक्के जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय झाला. या एमआयडीसीला नक्षलग्रस्त भागातील विकासाच्या धर्तीवर सवलती (आकांक्षित याेजना) आहेत. प्रोत्साहनपर करसवलती असतील. उद्याेगपती किशाेर कटारे यांच्या पुढाकारातून ही एमआयडीसी विकसित हाेत आहे.

शेजारच्या जिल्ह्यात सोयी
साेलापूरकरांना विमानसेवा हवी असेल तर शेजारच्या कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथून विमानसेवा आहे. तिथून मुंबई, बंगळुरू, चेन्नई, तिरुपतीला जाता येते.

उद्याेगांसाठी जागा हवी आहे. अक्कलकाेट रस्त्यावरील एमआयडीसीत जागा नाही. परंतु शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथे भूखंड जरूर मिळेल.आयटी क्षेत्रात नाेकरी हवीय शेजारच्या पुण्याशिवाय पर्याय नाही. तिथून हैदराबाद, बंगळुरूला लागेल. आई, वडिलांना साेडून नाेकरीसाठी साेलापूर साेडावेच लागेल.

बातम्या आणखी आहेत...