आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत कराडांचे विधान:इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात अजूनही महागाई कमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात अजूनही महागाई कमी आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटले. डॉक्टर भागवत कराड आज (शनिवारी) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी भागवत कराड यांचा पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

आपल्याकडे महागाईचा दर जास्त आहे. पण अमेरिका, चीनमध्ये जितकी महागाई आहे, त्या तुलनेमध्ये आपल्याकडे महागाई ही कमी आहे, असे कराड म्हणाले. तसेच ' चलनी नोटांवर गणपतीचे चित्र छापा हे गुजरात निवडणुकसाठी केजरीवाल यांची नौटंकी सुरू आहे. चलनी नोटांवर कोणत्याही दैवतांची चित्रे छापली जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.

रुपया सतत कमकुवत होतोय?

यापुर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (16 ऑक्टोबर) डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीबाबतचे विधान केले होते. रुपया कमजोर नसून डॉलर मजबूत होत आहे. एवढेच नाही तर इतर उदयोन्मुख बाजारातील चलनांच्या तुलनेत रुपयाने खूपच चांगली कामगिरी केली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. मुळात अर्थमंत्र्यांचे हे विधान अशा काळात म्हटले आहे की, जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहे. शुक्रवारी रुपया 12 पैशांनी घसरून 82.36 प्रति डॉलरवर बंद झालेला होता. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...