आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘न्यायालयीन कामकाजात उर्दू भाषेने जो प्रभाव सोडला आहे तो प्रशंसनीय आहे. मोठ्या प्रमाणावर उर्दूचे शब्द समाविष्ट झाले आहेत. या शब्दांची गोडी खूप आहे’, असे मत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केले. सोलापूर बार असोसिएशन व खादिमाने उर्दू फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने अशर-ए-उर्दू २०२३ अंतर्गत आयोजित परिसंवाद ‘अदालती कारवाई में उर्दू का रोल'' या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगी होते. प्रास्ताविक फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी केले. परिसंवादाचे मुख्य वक्ते ॲड. ए.जी. कुलकर्णी उपस्थित नसल्यामुळे त्यांचा लेख वरिष्ठ ॲड. अ. रशीद जानवाडकर यांनी प्रस्तुत केला. १८६० मध्ये इंडियन पीनल कोडचा उर्दू भाषांतर झाला व ‘ताजिरात-ए-हिंद'', ‘मुवक्कील'', ‘दफा ३०२'' ‘कैदे बामशक्कत’ सारखे शब्द अत्यंत लोकप्रिय झाले.
सुप्रसिध्द उर्दू कवी मिर्जा गालिब यांच्या शायरीत सुध्दा अनेक वकिलांची उर्दू शिकण्याची इच्छा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगी यांच्यासह अनेक वकिलांनी उर्दू भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी लवकरच उर्दूचे वर्ग तेथे सुरू करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी ॲड. जुलेखा पीरजादे व खतीब वकील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. करण भोसले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन नासिरोद्दीन आळंदकर यांनी केले. ॲड. अनिता रणशृंगारे यांनी आभार मानले. याप्रसंगी अनेक वकील उपस्थित होते.
न्यायालयीन शब्द दिसतात. ‘वकालत नामा'', ‘रोजनामा'', ‘शिरस्तेदार'', ‘नाजीर'' असे अनेक शब्द न्यायालयात दररोज बोलले जातात, असे सांगण्यात आले. वकिलांची उर्दू शिकण्याची इच्छा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आसिम बांगी यांच्यासह अनेक वकिलांनी उर्दू भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी लवकरच उर्दूचे वर्ग तेथे सुरू करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी ॲड. जुलेखा पीरजादे व खतीब वकील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. करण भोसले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन नासिरोद्दीन आळंदकर यांनी केले. ॲड. अनिता रणशृंगारे यांनी आभार मानले. याप्रसंगी अनेक वकील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.