आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर महामार्गावरील उपरस्ता, अतिक्रमण काढून काम करणार:महापालिका आयुक्तांची माहिती, संभाजी तलावच्या बाजूने कामाला सुरुवात

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर महामार्गावर संभाजी तलाव ते सोरेगावपर्यंत दोन्ही बाजूस सहा मीटर रुंदीचा उपरस्ता आहे. त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी टप्याटप्याने निधी उपलब्ध होईल त्यानुसार हे काम करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण असून, ते काढल्यानंतर काम होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

सैफुलपर्यंत दोन्ही बाजूस सहा मीटर रुंदीचा उपरस्ता आहे. तलावाच्या सुरुवातीस गाळे बांधून अतिक्रमण करण्यात आले. आयटीआय पोलिस चौकीच्या परिसरात सैनिक परिसरात रस्ता मोकळा आहे. तेथे रस्ता व रहदारी नसल्याने वाहने पार्क केली जातात. पहिल्या टप्प्यात निधी उपलब्ध होईल त्यानुसार प्रस्ताव तयार करुन कामाचे नियोजन करा असा आदेश आयुक्तांनी नगरअभियंता संदीप कारंजे यांना दिला. हे काम सुरू होण्यास तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, असा अंदाज आहे.

५४ मीटर रस्त्यासाठी कर्ज मागणी

संभाजी महाराज पुतळा ते स्वागत नगरपर्यंत ५४ मीटर रस्ता करण्यात येत आहे. तेथील भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी. त्यांना टीडीआर (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स) नको आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. या कामासाठी ५४ कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्यासाठी महापालिका कर्ज काढणार आहे. कर्ज मागणीचा प्रस्ताव शासनाकडे आहे. त्यानवर निर्णय झालेला नाही.

नियोजन समितीत मनपाने नवे 4 कामे सुचवले

महापालिका आयुक्तांनी शहरातील महत्वाचे रस्ते कामे काम नियोजन समितीकडे सुचवणार आहे. त्यात लालबहाद्दर प्रशाला ते संत तुकाराम चौक, मरिआई चौक ते प्रदर्शन मैदान, रेल्वे पूल ते इंद्रधनु परिसरातील कचरा संकलन केंद्र आणि मुळेगाव रोड ते राजेश पायलट रस्ता यांचा समावेश आहे. याबाबत नगर अभियंता कार्यालयाकडून इस्टीमेट करण्यात येत आहे.

पालिका आयुक्तांनी केली रस्त्याची पाहणी

शहरात पालिका भांडवली निधीतून २५ कोटीचे कामे करण्यात येत असून, त्यापैकी दयानंद काॅलेज ते रुपा भवानी मंदीर पर्यंत रस्ता करण्यात येत असून, त्या रस्ते कामाची पाहणी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी केली. यावेळी रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाची तपासणी व चाचणी करण्यात आले. यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे, अभियंता शांताराम अवताडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...