आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माढा:इंस्पायर फाउंडेशन इंडिया संस्थेचा पुढाकार, माढ्याची 'फुलांचे गाव' अशी ओळख होण्यासाठी वृक्ष वाटपाचा उपक्रम

संदीप शिंदे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माढा शहराला फुलाचे गाव अशी नवी भौगोलिक ओळख निर्माण करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य देखील या उपक्रमासाठी झटत आहेत

माढ्यातील "इंस्पायर फाऊंडेशन, इंडिया" या संस्थेने माढा शहराला फुलांचे गाव अशी ओळख होण्यासाठी फुलांची वृक्ष शहरवासियांना मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. माढा शहर तालुक्यासह बार्शी, मोहोळ तालुक्यात देखील पर्यावरण संवर्धनासाठी अन् पर्यावरण साक्षरतेची चळवळ या संस्थेने सुरू केली आहे.

पर्यावरण संतुलन राखण्याच्या या चळवळीला माढातील लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास शहराच्या सौदर्यात निश्चितच भर पडणार आहे. गेल्या आठवड्या भरापासुन या उपक्रमाची सुरूवात झाली असुन आता पर्यत 100 हुन अधिक शहरवासियांना फुलाचे वृक्ष वाटप करण्यात आलेत. सहाय्यक आयकर आयुक्त विपुल वाघमारे यांच्या संकल्पनेतून अन् मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून इंस्पायर फाऊंडेशनचे पर्यावरण संवर्धनाचे काम सुरु आहे.

प्रत्येक शहरवासियांनी आपल्या परिसरात एक जरी फुलाचे वृक्ष लावून त्याचे संवर्धन जरी केले तर प्रत्यक्षात फुलाचे गाव म्हणुन माढा शहर नावारूपास यायला काही वेळ लागणर नाही. पर्यावरणपूरक व विविध प्रजातींची बहावा, पळस, बुचाचे झाड ही भव्य स्वरूपात वाढणारी फुलांची झाडे आहेत. यामुळे आता या आकर्षक फुलांच्या झाडाची रोपे वाटप केली जात आहेत. केवळ फाऊंडेशन रोपे वाटप करीत असुन त्या कुटूंबाना वृक्षाचे महत्व पटवुन देऊन संगोपनाची जबाबदारी देखील देऊन संवर्धनाची शपथ देत आहेत.

माढा शहराला फुलाचे गाव अशी नवी भौगोलिक ओळख निर्माण करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य देखील या उपक्रमासाठी झटत आहेत. शहरातील ज्या कुटूंबाना किंवा व्यक्तिंना आपल्या घराच्या अथवा मालकीच्या जागेत फुलाचे वृक्ष हवे आहे. त्यांनी फाऊंडेशनच्या सदस्यांशी संपर्क साधल्यास फाऊंडेशनची टीम त्या कुटुंबियांची भेट घेऊन वृक्षाचे रोपणाच्या जागेची पाहणी करतील. शंभर ते सव्वाशे वर्षांपेक्षाही जास्त काळ जगणारी ही झाडे असल्याने त्या दृष्टीने स्थल निश्चिती करुनच त्यांना जबाबदारीपुर्वक वृक्ष दिले जात आहेत. पर्यावरणीय लोकचळवळीत सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

या अगोदर ही केली आहे 4500 वृक्षांची लागवड

इंस्पायर फाऊंडेशनने मागील तीन वर्षापुर्वी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. यामधून माढा शहरात 500 वृक्ष सध्या बहरत आहेत. तर माढ्याच्या परिसरातील गावात बार्शी, मोहोळ तालुक्यात देखील वृक्ष लागवड झाली होती. सध्याच्या घडीला 4 हजार 500 झाडे हिरवाईने नटली असुन अभिमानाने डौलत आहेत.

इंस्पायर फाऊंडेशनचे पर्यावरण संवर्धनाचे काम कौतुकास्पद असेच आहे. फुलांचे गाव अशी ओळख ठरणारा हा उपक्रम शहरवासियांसाठी अनोखा असा असुन इतर गावांसाठी देखील अनुकरणीय असाच आहे. मी देखील फाऊंडेशन कडुन फळाची झाडे घेतले आहे.
- मनिषा औदुंबर मोरे,माढा

(ज्यांना वृक्ष हवेत त्यांनी 9923493024 या क्रमांकावर संपर्क साधावा)

बातम्या आणखी आहेत...