आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या पंचायत राज्य विभागाने तयार केलेल्या 9 शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी प्रकल्पनात्मक दृष्टिकोन अंगीकार करण्याबाबत सूचित केले आहे. यासाठी नऊ संकल्पना निश्चित करून दिल्या आहेत.
या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींचे गुणांक करण्यात आले आहे. यापैकी नऊ ग्रामपंचायतची गुणांच्या आधारे निवड करून पुरस्कारासाठी अहवाल महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव , आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव , जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव या संकल्पना अंतर्गत प्रत्येकी तीन अशा सत्तावीस गावांची निवड करण्यात आली आहे.
या सत्तावीस पैकी प्रत्येक देहांतर्गत संकल्पने अंतर्गत एक अशा 9 गावांची नियुक्ती निवड सोलापूर जिल्ह्यातून करण्यात येणार आहे . निवड करण्यात आलेल्या नऊ गावांची माहिती संकलित झाल्यानंतर गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे त्याचे पडताळणी करून गुण देण्यात येणार आहेत. गुणात आघाडीवर असणाऱ्या नऊ गावांची माहिती राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेतून नऊ संकलित झालेल्या ग्रामपंचायतींना गुणांक देऊन केंद्र शासनाला राज्य शासनाच्या वतीने नऊ गावांची माहिती कळविण्यात येणार आहे .देशभरातून प्राप्त झालेल्या गुणाकाद्वारे देशपातळीवर नऊ गावांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त देशपातळीवर होण्याची शक्यता शेळकंदे यांनी व्यक्त केली आहे.
9 संकल्पना अंतर्गत गुणांकासाठी कमिटी
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा करिता जिल्हा परिषद स्तरावरून मूल्यांकनासाठी नऊ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत .या प्रत्येक समितीत सात अधिकाऱ्यांचा समावेश असून गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव या संकल्पने अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा समावेश आहे.
गावांना देश पातळीवर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नऊ गावांना देश व राज्य पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राज्य शासनाकडे गुणाकासह शिफारशी होणारे ती नऊ गावे कोणती? यासंदर्भात सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.