आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम राबवणार:अमली पदार्थांची विक्री, तस्करी रोखण्यासाठी राबवणार उपक्रम; जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची माहिती

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी होऊ नये, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत श्रीमती सातपुते बोलत होत्या. या वेळी राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक नितीन धार्मिक, औषध निरीक्षक सचिन कांबळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. बी. टी. दुधभाते, पोलिस निरीक्षक एस. आर. शिंदे आदी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना सातपुते यांनी दिल्या. प्रत्येक विभागांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती जनतेला द्यावी, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...