आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना उपचारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर औषधास पर्याय म्हणून विराफिन औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. भारत सरकारनेही विराफिनच्या वितरणास परवानगी दिली असून येत्या १५ दिवसांत हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे विराफिन औषधाचे रेमडेसिविरच्या तुलनेत दर कमी असतील. शिवाय मानवी शरीरावर याचे दुष्परिणामही कमी असतील, असा अंदाज मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या बाधित रुग्णांना रेमडेसिविर औषधांचे ६ डोस दिले जात आहेत. दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली आणि काही ठिकाणी काळाबाजारही सुरू झाला. रुग्णाचा जीव वाचावा म्हणून नातेवाईकांनाही मिळेल त्या किमतीत रेमडेसिविर घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या दुष्टचक्रात विराफिनमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णांना ठराविक दिवसांत ६ डोस द्यावे लागत आहेत. परंतु, विराफिन औषधाचा फक्त एक डोस द्यावा लागेल.
स्वस्तात मिळू शकेल इंजेक्शन
रेमडेसिविरला पर्याय म्हणून विराफिन या औषधाची निर्मिती झाली. भारत सरकारनेही याच्या वापराला व वितरणाला परवानगी दिली आहे. पंधरा दिवसांमध्ये हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. ते स्वस्तही मिळू शकेल. - सिद्धाराम चाबुकस्वार, अध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सोलापूर.
विराफिन औषधाचे हे आहेत फायदे...
रेमडेसिविरमुळे भविष्यात किडनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यांना मधुमेह, रक्तदाब आहे, तो त्रास आणखी वाढतो. पण विराफिनच्या वापरामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. शिवाय रेमडेसिविरच्या ६ डोसचा जो दर आहे, त्यापेक्षा कमी दरात विराफिन उपलब्ध होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.