आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Inspection Of Government Hospitals By The Deputy Secretary To The Central Government; Work In Progress To Find Out The Difficulties |marathi News

पाहणी:केंद्र सरकारच्या उपसचिवाकडून शासकीय दवाखान्याची पाहणी; अडचणी माहिती घेण्याचे काम सुरू

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नीती आयोग नवी दिल्ली, आरोग्य विभागाचे सचिव शोएब अहमद कलाल हे सोलापूर दौऱ्यावर आलेले आहेत. केंद्राकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना कशा पध्दतीने राबवल्या जात आहेत. त्या योजनांचा गरजूंना लाभ होतो की नाही, काय अडचणी आहेत, हे प्रत्यक्षात काम करणाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेत आहेत.

गुरुवारी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय, चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व कडबगाव येथील उपकेंद्राची पाहणी केली. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राचे कामकाज कसे होते. याविषयी माहिती घेत तेथे काम करणाऱ्या अशा वर्कर यांच्याशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिव्हिल सर्जन डा. प्रदीप ढेले, डॉ. एस. कुलकर्णी, डॉ. अमित पाटील उपस्थित होते.

उपसचिव कलाल यांनी डॉ. व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालय, शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माता व बाल आरोग्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान, हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम इ. कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यात निर्माण होणाऱ्या अडचणी माहिती घेतली जात आहे.

तसेच त्‍यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी देखील केली. दाराशा नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच त्‍यांनी नव्याने होणाऱ्या महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकामाची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...