आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण पवार कुटुंबीयांची एकदा चौकशी करा:त्यांचा खरा चेहरा समोर येईल; गोपीचंद पडळकर यांची पवार कुटुंबावर टीका

पंढरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावर जेवढी नावे आहेत, त्या सर्व व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे, म्हणजे पवारांचा खरा चेहरा समोर येईल अशा शब्दात भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आ.पडळकर हे सोमवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

तर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवरही त्यांनी जेारदार टीकरा केली आहे. ज्यांना लोकांमध्ये किंमत नाही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी युती केली आहे, अशी टीका भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.

पवार संविधानापेक्षा मोठे नाही
आमदार पडळकर म्हणाले की, पवार हे संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा एजन्सीजनी पवारांच्या कुटुंबातील सर्वांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी टीका करतानाच पडळकर यांनी शिवसेनेलाही लक्ष्य केले.

किंमत नसलेल्यांसोबत ठाकरेंची युती
ज्यांना लोकात कोणतीही किंमत नाही, जनाधार नाही अशा लोकांसोबत ते युती करीत राहत असून यावरून शिवसेना किती खोलात गेली आहे हे समोर आले असल्याचा टोला त्यांनी शिवसेना, संभाजी ब्रिगेड युतीसंदर्भात बोलताना सेनेला लगावला. अशा कोणत्याही टेकुने आता शिवसेना सत्तेवर येणार नसल्याचे पडळकर यांनी सांगितले .

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारे पासून खूप मोठी फारकत घेतली असून आता त्यांना परत ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे. ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला , ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार आहेत असाही सवाल यावेळी पडळकर यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...