आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरा दिवसांत एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढून फसवणूक केल्याच्या चार घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिसांना एकाचाही तपास करता आलेला नाही. तक्रारदाराचे कार्ड वापरून एटीएम केंद्रातून पैसे काढताना संशयितांची छबी तेथील कॅमेऱ्यात कैद झालेली असणार. रक्कम काढल्याच्या वेळा व इतर तपशीलही बँकेकडे असणार. असे असूनही पोलिसांचा तपास शून्य स्थितीत आहे. १४ ते ३१ डिसेंबर २०२२ या पंधरा दिवसांत तब्बल चार घटना झाल्या आहेत.
यामध्ये साधारण ५ लाखांचा ऐवज गेला आहे. काहीजण गडबडीत एटीएम कार्ड घेण्याचे विसरतात. कोणाची तरी मदत घेतो, त्यावेळी कार्ड चोरटे अदलाबदल करतात. कार्ड आपणास देताना पिनकोड समजून घेतात. मदत घेतल्यानंतरही आपलेच कार्ड आहे की नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे. सावध राहा हाच उपाय आहे, असे पोलिसांनी सांगितले.
१५ दिवसांतील घटना अशा, एकूण पाच लाखांची फसवणूक
२४ डिसेंबर रोजी होटगी रोड येथील रहिवासी कृष्णाजी बुलीॅ यांच्या एसबीआय एटीएम कार्डची अदलाबदल करून २७ हजार ५०० रुपये काढून घेतले आहेत. १४ डिसेंबर रोजी नवनाथ चीटमपल्ली (रा. जुना विडी घरकुल) यांच्या खात्यातून नऊ हजार रुपये काढून घेतले आहेत. जेल रोड परिसरातील एसबीआय एटीएममध्ये हा प्रकार घडला होता.
दिगंबर मल्हारी जाधव (रा. इंदिरानगर बक्षीहिप्परगा) यांनी जोडभावी पेठ पोलिसात ३१ डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. ३ लाख ९२ हजार काढून घेतले आहेत. स्वाती भालचंद्र सालसकर (रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, कोर्णाकनगर, जुळे सोलापूर) ३१ डिसेंबर रोजी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. मदतीचा बहाणा करून चोराने कार्डची अदलाबदल करत ४२ हजार ८५० रुपये काढून घेतले आहेत.
एटीएममधून काढताना व्यवहार पूर्ण होईपर्यंत सावध राहा एटीएममधून पैसे काढताना व्यवहार होईपर्यंत सावध राहा. सध्याच्या कार्डमध्ये चीप आहे. पूर्ण व्यवहार झाल्याशिवाय कार्ड बाहेर काढता येत नाही. कोणी मदतीचा बहाणा करून कार्ड घेतले असेल तर ते आपलेच आहे की नाही याची खातरजमा जमा करा. पैसे काढल्यानंतर सुद्धा काहीजण गडबडीत व मोबाईल पाहण्यात कार्ड तिथेच विसरतात. यामुळे सावध राहा हाच उपाय आहे. पीन टाइप करताना कोणी पाहत तर नाही ना याची काळजी घेतलीच पाहिजे.’’-फौजदार अविनाश नळेगावकर, सायबर सेल, सोलापूर शहर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.