आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास याेजनेतून दुप्पट-तिप्पट दराने पुस्तके खरेदी केल्याचा प्रकार समाेर आला आहे. या याेजनेतून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ काेटी रुपयांप्रमाणे ३६ काेटी रुपयांची पुस्तके खरेदी केली जात आहेत. समाजकल्याण विभागाच्या टेंडर प्रक्रियेतील हा घाेटाळा उघडकीस येताच शासनाच्या समाजकल्याणचा सांस्कृतिक चेहरा काळवंडला आहे. समाजकल्याण आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी या खरेदी व्यवहाराला स्थगिती देत पुरवठाधारकास उर्वरित १५ काेटींचा निधी वितरित करू नये, असा आदेश समाजकल्याण सहायक आयुक्तांना (साेलापूर) दिला आहे.
शासनाने २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबाैद्धांच्या वस्त्यांमधील अभ्यासिकांसाठी ही याेजना आणली. अहमदनगर येथील शब्दालय पब्लिकेशन हाऊसकडून प्रत्येक जिल्हासाठी १ काेटी रुपयांची पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय झाला हाेता. अभ्यासिकांना प्रत्येकी २१० पुस्तकांचा संच दिला जात आहे. संचासाठी ९९ हजार ७५० रुपये खर्च मंजूर केला. राज्यातील २१ जिल्ह्यांचे २१ काेटी रुपये संबंधित उपायुक्तांना अदा केले. १५ जिल्ह्यांचे १५ काेटी आयुक्तालयाने अदा केले नाही. खरेदी करण्यात असलेल्या पुस्तकांच्या किमतीमध्ये दुप्पट ते तिप्पट तफावत असल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने शब्दालय प्रकाशनाला रक्कम अदा करण्यास मनाई करणारा आदेश पाठवला.
पुस्तके बाजारभाव वाढीव किमत शत्रू जित १६२ ६५५ एक हाेता १७० ५६५ वाडा वासक १५० १०५० सज्जिका परवड १४२ ४९९ आता हाेऊन ६० ६८४ जाऊ द्या उवाच २०० ८९७
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.