आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतर:छ. संभाजीराजेंना महत्त्व द्यायचे की औरंगजेबाला? : एकनाथ शिंदे

साेलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘औरंगाबादला संभाजीनगर संबाेधणे आणि नामांतर करणे हा तिथल्या (औरंगाबादकरांच्या) लाेकांच्या अस्मितेचा विषय आहे. लाेकांच्या भावनांचा विचार करूनच शिवसेना या प्रश्नाच्या उत्तराप्रत येत आहे. मुळात आैरंगजेबाप्रति प्रेम कशासाठी? छत्रपती संभाजीराजेंना महत्त्व द्यायचे की औरंगजेबाला..?’ असा प्रतिप्रश्न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी शहरांच्या नामांतराला गांभीर्याने घेणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत विचारले असता त्यांनी उपराेक्त विधान केले. या उत्तरावर पत्रकारांनी पुन्हा ‘याचा अर्थ पवारांच्या विधानाला तुम्ही गांभीर्याने घेणार नाही का?’ असे विचारले असता शिंदे म्हणाले की, ‘पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चालत आहे.’ शिंदे यांचा शनिवारी साेलापूर दाैरा हाेता. महापालिका आणि नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर सात रस्त्यावरील नियाेजन भवनमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी भाजप आक्रमक झालेला आहे. आंदाेलनाच्या पवित्र्यात आहे. यावर शिवसेनेची भूमिका काय? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, ‘मुंडेंची चाैकशी सुरू आहे. गृहमंत्र्यांनी त्यावर विधान केले. तेच याेग्य ताे निर्णय घेतील.’

बातम्या आणखी आहेत...