आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासाठी आतापर्यंत दाेन मक्तेदार झाले. पुन्हा एकदा काम थांबवून पूर्वीच्याच पाेचमपाड कंपनीला काम देण्याचा घाट घातला जात आहे.
अशा निविदा प्रक्रिया राबण्यात टक्केवारीचे राजकारण आहे कायॽ असा थेट सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी नागपूरच्या विधानसभागृहात चर्चेवेळी पुरवणी मागणी केली. स्मार्ट सिटीच्या कामातील त्रुटींवरही त्यांनी घणाघात केला. कारखाना चिमणीची भानगड सोडा आणि बोरामणी विमानतळ उभारणीकडे लक्ष द्या, असा सल्लाही दिला.
स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांचा त्रासच, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार शिंदेंची मागणी
1 समांतर जलवाहिनीचे काम पोचमपाड कंपनीकडून काढून लक्ष्मी इंजिनिअरिंगला दिले. हे काम २४ नोव्हेंबरपासून पुन्हा थांबवले. यावर आमदार शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत समांतर जलवाहिनीच्या कामाबाबत नगरविकास मंत्रालयाचे लक्ष वेधले.
2 समांतर जलवाहिनीचे काम रखडवल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
3 स्मार्ट सिटी योजनेतून होणाऱ्या निकृष्ट कामांचा प्रश्न उपस्थित केला. कामे अर्धवट केली जातात, त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.
कारखान्याच्या चिमणीवरून सुरू आहे राजकारण
आवाहन : बोरामणी विमानतळाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन आमदार प्रणिती यांनी सभागृहात केले.
मागणी : होटगी रोडवर जुने विमानतळ आहे. परंतु सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबतीत राजकारण सुरू झाले आहे. चिमणीची भानगड सोडून बोरामणी विमानतळ उभारणी करा.
सार्वजनिक नळ तोडण्यापूर्वी पर्यायाची माहिती द्या
कारवाईची घाई : अमृत योजनेतून नवीन पाइपलाइन घालण्यासाठी पूर्वीचे सार्वजनिक नळ बंद करण्याची घाई केली जात आहे. नागरी सूचना म्हणून कचराकुंडीवर नोटीस लावताहेत.
स्थगिती द्या: वस्त्यांमधील सार्वजनिक नळ बंद करण्यापूर्वी नागरिकांना पर्यायी व्यवस्थेची माहिती दिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक नळ बंद करण्यास तातडीने स्थगिती द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.