आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभविष्य निर्वाह निधी असो, नाव दुरुस्त करणे असो किंवा पेन्शनची माहिती अशा शिबिरातून मार्गदर्शन मिळाले तर महिलांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे काम करणे सोपे जाते. असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी आज मांडले.
प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांसाठी सोलापूरातील शिवमहेश्वरी मंदिर, गिरी झोपडपट्टी, दत्तनगर येथे 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध योजना शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दत्तनगर भागामध्ये बहुसंख्य विडी कामगार असून त्यांचे विडी कारखान्यामध्ये कामगारांचे नाव, वय व इतर चुका असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांसाठी फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शनकरीता लागणारे कागदपत्रे दुरुस्ती करणे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिंदे यांनी महिलांना कोणत्याही प्रकारे शिक्षणापासून वंचित असलेल्या महिलांनी घाबरून जाऊन आपल्या कामकाजात अडचणी निर्माण करू नये तर अशा शिबिरांच्या माध्यमातून आपल्याला मदत कशी मिळवता येईल याची नियोजन करावे असे आवाहन केले. अशा शिबिरांच्या माध्यमातून महिलांच्या छोट्या छोट्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांचे आर्थिक काम मार्गी लागतात. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी असो किंवा नाव दुरुस्त करणे असो किंवा पेन्शनची माहिती असो अशा शिबिरातून माहिती मिळाल्याने महिलांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे काम करणे सोपे जाते असे मत प्रणिती शिंदे यांनी मांडले.
शिबीराचा बहुसंख्य विडी कामगारांनी लाभ घेतला व आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. यावेळी प्राव्हीडंड फंड लेखाधिकारी, सोलापूर पवनकुमार ठाकूर, प्राव्हीडंड फंड लिपीक अक्षय पावडे, तिरुपती परकीपंडला, सतीश साळुंखे व बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.