आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बाळंतपणावेळी विवाहिता अल्पवयीन असल्याचे उघड ; पतीसह 5  जणांवर गुन्हा

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळंतपणावेळी विवाहिता अल्पवयीन असल्याचे उघड झाल्यानंतर अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याने पतीसह बार्शी व माढा तालुक्यातील सासू, सासरे, मुलीचे आई व वडील अशा ५ जणांविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार व इतर कलमान्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माढा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह बार्शी तालुक्यातील एका तरुणाबरोबर ३ वर्षांपूर्वी झाला होता.

विवाहानंतर अल्पवयीन मुलीस एक अपत्य झाले. नंतर अल्पवयीन पीडिता ही दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने तिला सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेच्या नातेवाईकांकडून तिचे वय २० वर्ष सांगण्यात आले होते. रुग्णालयाकडे आधार कार्ड आल्यावर तिचे १७ वर्ष पूर्ण असल्याचे दिसून आले. दरम्यान पीडितेने पुन्हा दुसऱ्या अपत्यास जन्म दिल्याने तिची प्रकृती खालावली होती.