आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न विमानसेवेचा:विमानसेवेतील अडथळे दूर करणे ही जिल्हाधिकाऱ्यांचीच जबाबदारी

साेलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानसेवेतील अडथळ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर ६० दिवसांत त्यावर कारवाई करण्याचा कायदा संसदेत झाला. हा विषय पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला आहे. परंतु हाेटगी रस्त्यावरील सोलापूर विमानसेवेचा मुद्दा महापालिकेकडे गेला. त्यामुळे त्यावर काहीच कारवाई हाेत नाही, अ‌शी माहिती माजी खासदार अॅड. शरद बनसाेडे यांनी रविवारी दिली.

खासदार असताना काय केले? हा प्रश्न उपस्थित हाेईल म्हणून त्यांनी त्यांचेही स्पष्टीकरण दिले. ‘त्यावेळी हा प्रश्न न्यायालयात गेल्याने मी हतबल हाेताे’, असे ते म्हणाले. विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चक्री उपाेषणाला त्यांनी रविवारी आभासी पद्धतीने पाठिंबा दिला. मुंबईतच एक व्हिडिआे बनवून एक साेलापूरकर म्हणून त्यांनी भावना मांडल्या.

आंदाेलनाकडे नेत्यांची पाठ, सामान्यांचा वाढता पाठिंबा
आंदाेलनाचा रविवारी १५ वा दिवस हाेता. तरीदेखील लाेकप्रतिनिधी आंदाेलन स्थळाकडे फिरकले नाहीत. विमानसेवेचा विषय संसदेत मांडणारे खासदार महास्वामी आंदाेलकांशी बाेलायला तयार नाहीत. आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांनी भूमिका जाहीर केली नाही. आमदार प्रणिती शिंदे यांचा आेढा बाेरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. अशा स्थितीत असलेल्या आंदाेलनात सामान्यांचा माेठा पाठिंबा आहे. रविवारी उद्याेजक, व्यापारी, नाेकरदार, निर्यातदार, शिक्षक, विद्यार्थी माेठ्या संख्येने हजेरी लावून स्वाक्षरी माेहिमेत सहभाग नाेंदवला.

माेठे उद्याेग येत नाहीत म्हणून लोकांचे स्थलांतर वाढले
साेलापुरात माेठ्या शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले की, राेजगारासाठी त्यांना साेलापूर साेडावेच लागते. केवळ विमानसेवा नसल्याने हा प्रकार सुरू झाला. त्यामुळे स्थलांतर वाढले. एका नेत्याने विमानसेवेसंदर्भात उपाय सुचवला की एकाच बाजूने सेवा सुरू करण्याचा. डीजीसीए त्याला परवानगी देणारच नाही. प्रवाशांची सुरक्षा हा त्यांच्या दृष्टीने प्राधान्याचा असताे. सेवेतील अडथळे दूर करण्याचेच काम व्हायला पाहिजे. आमची पिढी गेली. भावी पिढीसाठी तरी साेलापूरला विमानसेवा आवश्यक आहे.’’-अॅड. शरद बनसाेडे, माजी खासदार

बातम्या आणखी आहेत...