आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित गांधी यांचे स्पष्ट मत:प्रथम विमान निर्मिती करणाऱ्यांच्या गावातच विमानसेवा नाही, हे दुर्दैवी

साेलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरचे सुपुत्र आणि देशात सर्वप्रथम विमान बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या शेठ वालचंद हिराचंद यांच्या गावातच विमानसेवा नाही, हे दुर्दैवी आहे. दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाच्या शहरात विमानसेवा हवीच, असे स्पष्ट मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मांडले. हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी सेवा देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चक्री उपाेषणाला त्यांनी पाठिंब्याचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी हे परखड मत मांडले.

शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग क्षेत्रातील विकासासाठी १९२७ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. राज्यभरातील ८०० व्यापारी, औद्योगिक संघटना, ७ लाखांहून अधिक उद्योग, ३० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे नेतृत्व महाराष्ट्र चेंबर करत आहे. सध्याच्या युगात विमानसेवा ही अत्यावश्यक बाब बनली आहे. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी, ही सातत्याने प्रयत्नशील असून, केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदनही दिले, असेही गांधी म्हणाले. रविवारी दुपारी बैठक : साेलापूर विचार मंचच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता विमानसेवेविषयी बैठक आयाेजित केली आहे.

१९ व्या दिवशीही पाठिंब्याचा ओघ सुरूच साेलापूर विकास मंचच्या वतीने सुरू झालेल्या चक्री उपाेषणाच्या १९ व्या दिवशीही पाठिंबा देण्यासाठी लाेकांचा ओघ सुरूच हाेता. बांधकाम व्यावसायिक शैलेश करवा, व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे, फोटोग्राफर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वग्गा, फोटो लॅब असोसिएशन अध्यक्ष गणेश कटकधोंड आदी पाठिंब्याची पत्रे देऊन सक्रिय झाले.

बातम्या आणखी आहेत...