आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्धत:आडनावावरून जात ठरवणे हे अत्यंत चुकीचे; राज्य मागासवर्गीय आयोगाची ओबीसी डाटा गोळा करण्याची पद्धत चुकीची

उत्तर सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सुरू असलेली ओबीसी एम्पेरिकल डाटा गोळा करण्याची पद्धत चुकीची असून ही सदोष पद्धत बंद करून योग्य पद्धतीने सर्वेक्षण केले जावे अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.आडनावावरून जात ठरवणे हे अत्यंत चुकीचे असून आयोगाने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते व व पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, ओबीसी सेलचे राज्य जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लतीफ तांबोळी, विजयकुमार पोतदार, आप्पाराव कोरे, राजेश सुतार ,शिवानंद बंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...