आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधम्मात उपजाती नाहीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. आम्ही स्थानिक स्पर्धा न करता जागतिक पातळीवर प्रगती करू पाहतोय. धम्म विशाल व अथांग आहे, सर्वांनी अनुकरण करणे काळाची गरज आहे. बहुजनांनी बौध्द धम्मात सहभागी व्हावे’, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी रविवारी येथे केले
जनगणना करण्यासाठी येणाऱ्यांना धर्म हिंदू न सांगता बौद्ध लिहा, प्रवर्ग एससी लिहा, बौध्दमध्ये उपजाती नाहीत, असेही त्यांनी सांगितले. भारतीय बौध्द महासभेतर्फे हुतात्मा स्मती मंदिरात रविवारी धम्म परिषद झाली. तिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजश्री गायकवाड होत्या. या वेळी दिनेश हणमंते, वैभव जबडगे, डॉ. औदुंबर मस्के, अरुणा रणदिवे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, बौद्ध धम्मात समाजातील प्रत्येक घटक सहभागी झाल्यास बाबासाहेबांचे स्वप्न साकार हाेईल. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच नागपूर याठिकाणी बौद्ध विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी ६० एकर जागाही प्राप्त झाली आहे. स्वतंत्र विद्यापीठ झाल्याने गुुरुकुल पध्दतीने शिक्षण दिले जाणार आहे. जास्तीत जास्त संशोधनाला वाव मिळणार आहे. ठाण्यामध्येही बँकेची सुरुवात केली आहे. एकूण अर्थिक सुबत्ता येण्यास मदत होईल. महासभेचे संघटन मजबूत करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने अर्थिक योगदान द्यावे, असे आंबेडकर म्हणाले. दीपाली लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. रामजी गायकवाड यांनी आभार मानले.
दलित- नवबौद्ध असे शब्दप्रयोग करायला नकोत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बौद्ध’ म्हणून दीक्षा घेतली, विविध जातीच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. मात्र दलित व नवबौध्द यासारखे शब्दप्रयोग करून पोटजाती निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू आहे. समाजाने बौद्ध म्हणूनच जगावे. जग बौद्ध म्हणूनच आपल्याकडे बघते आहे. त्यामुळे बौद्ध ही खरी ओळख निर्माण करा. भारत बौध्दमय करा, यासाठी सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहन बाबासाहेबांचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.