आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसले गुरुजींचा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर:जिल्हा परिषदे्च्या सेवेत असल्याचे आणून दिले निदर्शनास

सोलापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजीतसिंह डिसले यांचा राजीनामा प्रशासकीय कारणास्तव नामंजूर केला आहे. तरी आपण जि.प च्या सेवेत आहात याची नोंद घ्यावी असे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. ते पत्र गटशिक्षणाधिकारी व त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाही पाठवले आहे.

जिल्हा परिषद प्रा.शाळा कदम वस्ती (परितेवाडी) ता.माढा येथे कार्यरत असलेल्या रणजीतसिंह डिसले यांनी जानेवारी महिन्यात अमेरिकेत संशोधन करण्यासाठी जाणार होते,त्यासाठी रजेचा अर्ज टाकला होता. आवश्यक ती कागदपत्रे द्यावी असे शिक्षण विभागाने सांगितल्याने मोठा गदारोळ झाला होता. डिसलेंने शिक्षण विभागावर आरोप केले होते. शेवटी तत्कालीन शिक्षणमंत्री यांच्या मध्यस्थीने त्यांना 153 दिवसाची रजा मंजूर झाली आहे. मात्र दरम्यान डाएट वेळापूर याठिकाणी नियुक्ती असताना कामच केले नाही. असा तक्रारीवरून त्याची चौकशी केली. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार होता. दरम्यान त्यांनी राजीनामा 6 जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्याकडे राजानाम्यासाठी दिला होता. तो अर्ज गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पुढील कारवाई करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे आला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यावर शेरा मारून अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठवला होता. डिसले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे या राजीनामा सर्वांचे लक्ष लागले होते. प्रशासकीय कारणास्तव डिसलेंचा राजीनामा मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याचे नोंद घेण्याबाबत संबंधितांना कळविणे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास द्यावा असे शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटलं आहे.

बातम्या आणखी आहेत...