आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गहाण ठेवलेले दागिने परत मागितल्याने महिलेला शिवीगाळ:महिला नातेवाईकानेच केली फसवणूक; गुन्हा दाखल

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नातेवाईक असलेल्या एका महिलेला तिच्या वडिलांची गहाण पडलेली शेती सोडविण्यासाठी मोठ्या विश्वासाने रोख साडेतीन लाख रूपये व 15 तोळे सोन्याचे दागिने गहाणवट करायला दिले. एकूण या व्यवहारातील सोन्याचे दागिने व रक्कम एकूण 11 लाख रूपये परत मागिल्याने तिने उलट शिवीगाळ केली. अशी फिर्याद वैशाली सतीश स्वामी, (वय 39 रा. पूर्व मंगळवार पेठ) यांनी दिली.

अनिता उर्फ राजेश्वरी सिद्धेश्वर स्वामी (रा. सुतमिल लक्ष्मी मंदिर , किसान नगर) असे त्या फसवणूक केलेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी वैशाली स्वामी व आरोपी अनिता स्वामी या दोघीही एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघी मिळून भिशी देखील चालवतात. त्यामुळे आर्थिक व्यवहाराबाबत त्यांचा विश्वास होता. यामुळे अनिता स्वामी हिने वडिलांची शेती गहाणखतातून सोडवून घ्यायचे असल्याने वैशाली स्वामी यांच्याकडे चार लाख रूपयांची गरज आहे, असे सांगितले.

शेती सोडविल्यानंतर 15 दिवसांत पैसे परत देते असे सांगून पैशाची मागणी केली. मात्र ऐवढे पैसे नसल्याने वैशाली स्वामी यांच्याकडील 15 तोळे सोन्याचे दागिने घेऊन ते अनिता स्वामी हिने ओळखीतील सराफ बाजारातील समृद्धी ज्वेलर्स यांच्याकडे ठेवले. आलेली सर्व रक्कम घेतली. तसेच वैशाली स्वामी यांच्याकडे बचत गटाचे साडेतीन लाख रूपयेही दिले. ही घटना फेब्रुवारी 2021 मध्ये घडली.

शेती सोडविण्याचा बहाणा करून घेतलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत केली नाही. सोन्याचे दागिने मागण्यास गेल्यानंतर दागिने सोडवून देणार नाही, असे म्हणून दमदाटी केली व फसवणूक केली, अशी फिर्याद वैशाली स्वामी यांनी पोलिसांत दिली. जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...