आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी आरमारचा मेळावा‎:स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरच्या योगदानाचा जागर‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी आरमारच्या वतीने‎ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दसरा दरबार मोठ्या‎ उत्साहात पार पडला. यावेळी "स्वातंत्र्य‎ लढयातील सोलापूरचे योगदान’ या विषयावर‎ डॉ. श्रीकांत येळेगावकर यांचे व्याख्यान झाले.‎ फडकुले सभागृहात छत्रपती संभाजी‎ महाराजांच्या मूर्तीचे आणि शस्त्रपूजन करून ‎ ‎ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.‎

याप्रसंगी मनपाचे सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा‎ भगत, महावितरणचे कार्यकारी अभियंता‎ चंद्रकांत दिघे, उत्तम सुर्वे, डॉ. सुनील शेवाळे,‎ अॅड. गणेश पवार आदी उपस्थित होते.‎ अध्यक्षस्थानी संभाजी आरमारचे संस्थापक‎ अध्यक्ष श्रीकांत डांगे होते. यावेळी डॉ.‎ येळेगावकर यांनी सोलापूर व मार्शल लॉचा‎ इतिहास विविध उदाहरणासह सांगितला.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

याप्रसंगी संभाजी आरमार उपाध्यक्षपदी ‎शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, शहर ‎संघटक राज दवेवाले, उपशहरप्रमुख राज ‎ ‎ जगताप, रोहित मनसावाले यांची निवड‎ करण्यात आली. सूत्रसंचालन गिरीश देवकते ‎ ‎ यांनी तर प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी‎ केले. यावेळी शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, ‎ ‎ गजानन जमदाडे, अनंतराव नीळ आदींसह ‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

यांचा झाला गौरव
हुतात्मा मलप्पा धनशेट्टी‎ यांचे पणतू शिवकुमार धनशेट्टी यांचा मानपत्र‎ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच‎ व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे, सामाजिक‎ कार्यकर्ते किरण लोंढे, शतकवीर पेशीदाता‎ शैलेश जाधव, जयहिंद फूड बँकेचे सतीश‎ तमशेट्टी, बेघरांसाठी कार्य करणारे मोहन‎ तलकोलोल्लू यांचा त्यांच्या योगदानाबद्दल‎ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...