आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम:240 दिव्यांगांना बसवणार जयपूर‎ फूट, शिबिरामध्ये माप घेणे सुरू‎

साेलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर‎ दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम गतीच्या‎ माध्यमातून मोफत जयपूर फूट बसवण्यात‎ येणार आहे. त्यासाठी दोन दिवसीय शिबिराचे‎ इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सोलापूर‎ शाखेत उद्घाटन करण्यात आले. माजी‎ प्रांतपाल व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे‎ चेअरमन डाॅ. राजीव प्रधान यांच्या हस्ते‎ उद्घाटन झाले. दोन दिवसाच्या शिबिरात २४०‎ जणांचे जयपूर फूटसाठी मोजमाप घेण्यात‎ येणार आहे.

त्यानंतर दीड महिन्यानंतर‎ दिव्यांगांना जयपूर फूट बसवण्यात येणार आहे.‎ दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फूट व‎ कृत्रिम हातांचे वितरण दरवर्षी शिबिर घेऊन‎ करण्यात येते. हे शिबीर रत्न निधी चॅरिटेबल‎ ट्रस्ट मुंबई, श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ व‎‎‎‎‎‎‎‎‎‎ इंडियन रेडक्राॅस सोसायटी यांच्या संयुक्त‎ विद्यमाने आयोजित केले आहे. शनिवारीही‎ लाभधारकांच्या पायाचे माप घेण्याचे काम‎ चालू राहणार आहे. व्यंकटेश चन्ना, जयेश‎ पटेल, डाॅ. निहार बुरटे, अतुल सोनी, डाॅ.‎ केदार कहाते, सलाम शेख, डाॅ. श्रीकांत‎ अंजुटगी, सचिन चौधरी, धनश्री केळकर,‎ अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...