आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटलांनी चालवली एसटी:रोहित पाटलांचीही नसती उठाठेव; भाजपकडून कारवाई करण्याची मागणी

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपची पोलिसांत तक्रार

राष्ट्रवा्दी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांनी एसटी चालवल्याने वादाचे मोहोळ उठवले आहे. या प्रकरणी दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी होतेय.

इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती.

इस्लामपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी याबद्दल आक्षेप घेत थेट पोलिस ठाण्यात बेकायदेशीर एसटी चालविल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही भाजपने केली आहे.

दुसरीकडे सांगलीतील दुसरे नेते रोहित पाटील यांनीही एसटीचे स्टेरिंग हातात घेत, लाल परी चालविल्याचे दिसून आले. रोहित पाटील आणि जयंत पाटील यांच्या एसटी चालविण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना इस्लामपूरमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. जयंत पाटील हे प्रसिध्दीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. बस चालविण्याचा प्रयोग हा बेजबाबदारपणाचे लक्षण असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव नाही, दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते.

मोरे पुढे म्हणाले की, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता लोकशाहीचा सन्मान करत गुन्हा दाखल करावा.

कवठेमहांकाळ आगारीतील लालपरी

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आगारात 2 नवीन गाड्या दाखल झाल्या. यावेळी आगाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित आर.आर. पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी रोहित पवारांनी कवठेमहांकाळहून मुंबईकडे फेरी घेऊन जाणाऱ्या गाडीच्या स्टेअरिंगवर जाऊन बसले आणि त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत नवीन फेरीची सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...