आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय:इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात आमदार फोडून भाजपला सत्तांतर घडवणे अशक्य : जयंत पाटील

पंढरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमदाराने राजीनामा दिल्यास पुन्हा निवडून येण्याची ताकद नाही

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आमच्या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. आमच्या एका जरी आमदाराने राजीनामा दिला तर परत निवडून येण्याची त्याची ताकद नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असल्यामुळे आमच्या सरकारला धोका नसल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सध्या महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची आवई उठवली जात आहे. 

शिवाय राजस्थानचे काँग्रेस सरकारही अस्थिर झाले असल्याबद्दल पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आव्हान कधीही स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे. सध्याची महाराष्ट्रातील भाजपची स्थिती पाहता इतर राज्यांप्रमाणे भाजपला महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडून सत्ता परिवर्तन घडवून आणणे अशक्य असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली

सिनेअभिनेता अक्षय कुमारचा नाशिक येथील हेलिकाॅप्टर दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे सुद्धा हेलिकॉप्टरनेच पंढरपुरात दाखल झाले. त्या विषयी विचारले असता, हेलिकॉप्टर हे दुसरीकडे चालले होते. मध्येच लिफ्ट मिळाली म्हणून हेलिकॉप्टरने पंढरपुरात आलो, असे मिश्किल उत्तर पाटील यांनी दिले.