आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:जेईई अॅडव्हान्स; ३२ मुलांना थेट आयआयटीमध्ये प्रवेश

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापुरातील ३२ विद्यार्थ्यांना थेट आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामध्ये बाकलीवालचे २०, लॉजिकचे ८ तर वालचंदचे चार जण पात्र ठरलेले आहेत.

बाकलीवालचे २० जण पात्र, देवांश ठक्कर १८३ रँक
बाकलीवाल ट्युटोरिअल्सच्या २० विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स २०२२ या परीक्षेत यश संपादन केले आहे. या स्पर्धात्मक परीक्षेत सोलापूरच्या अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले आहे. प्रांजल कट्टे ऑल इंडिया रँक ८२, देवांश ठक्कर १८३, आयुष मुंदडा ५२०, साक्षी हिरेमठ ६२७, अरिन कुलकर्णी १९१६, अर्णव साळवे २०७९, प्रतिक साबळे २५९५, आभा लहुरीकर २७७२, मोहीत मगरे ३१६२, सर्वेश पडसलगीकर ३८२६, जयराज दुलंगे ३७९१, ओमकार कांबळे ४१४४, श्रेयश काटकर ५०५९, अमोघ मठपती ८१७८, लक्ष छाजेद २००००, केदार ढेपे ८६९१,वैभव केदार ५०९५, हर्षवर्धन घोंगडे २०९९ रॅक मिळवून यश संपादन केले आहेत.

लॉजिक चे ८ विद्यार्थी पात्र
लॉजिक इन्स्टिट्यूट च्या ८ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादित करीत आयआयटीसाठी पात्र ठरले आहे. ऑल इंडिया रँकप्रमाणे संकेत मेलगिरी १४६३, अथर्व कुलकर्णी १२८४ , मृण्मयी पवार २४५८ , रोहन लांबतुरे ६५२, ऋषी देशमुख २३५९५, सर्वेश पत्की ३१३३, सुयोग आरळीमार ३९६२, अश्विन शिंदे ६९६ रँक मिळाला आहे.

वालचंदच्या ४ जणांची बाजी
वालचंद कॉलेज ऑफ आर्ट््स ॲण्ड सायन्सच्या ४ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. प्रियंका होटकर (एस.सी. रँक – ६७३), राजवर्धन पाटील (जनरल रँक २११८९), प्रणित साबळे (एस.सी. रँक ७९०) आणि यश होटकर (एस.सी. एस.सी. रँक २५२९) अशी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा बलाढ्य संस्थेमध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ .जीवराज कस्तुरे आणि समन्वयक सारिका महिंद्रकर यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...