आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलती यंदा रद्द:जेईई मेन्स ; बारावीत 75 टक्के आवश्यक,कोरोनातील सवलत आता रद्द‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील अभियांत्रिकी‎ महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी घेण्यात‎ येणाऱ्या जेईई मेन्सच्या सत्र एकच्या‎ परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली‎ असून १२ जानेवारी अर्ज करण्याची‎ शेवटची तारीख आहे. ही परीक्षा जानेवारी‎ आणि एप्रिल २०२३ मध्ये दोन टप्प्यात‎ होणार आहे. त्याच्या तारखादेखील‎ जाहीर केल्या आहेत. कोरोनाकाळात‎ २०२१-२०२२ मध्ये परीक्षेसाठी दिलेल्या‎ सवलती यंदा रद्द केल्या आहेत. बारावीत‎ ७५ टक्के गुणांचा नियम गेल्या परीक्षेत‎ शिथिल केला होता. तो पुन्हा यंदापासून‎ जैसे थे ठेवण्यात आला आहे. एससी,‎ एसटी साठी ६५ टक्के आवश्यक आहे.‎

जेईई मेन्सच्या सूचना पत्रानुसार‎ आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश‎ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत ७५‎ टक्के गुण अनिवार्य केले आहेत.‎ काेराेनाकाळात दिलेल्या सुविधांमुळे‎ सीबीएसईने अट शिथिल करण्याचा‎ निर्णय घेतला होता. जेईई अॅडव्हान्स‎ परीक्षेत पात्र न हाेणारे विद्यार्थी जेईई‎ मेन्सच्या गुणांवर एनआयटीमध्ये प्रवेश‎ घेतात. अन्य विद्यार्थी अभियांत्रिकीच्या‎ इतर अभ्यासक्रमांना जेईई मेन्सच्या‎ गुणांच्या आधारे प्रवेश घेतात.‎ काेराेनाकाळात विद्यार्थीही मिळालेल्या‎ सुविधांमुळे निश्चिंत होते. मात्र, आता‎ सर्व विद्यार्थ्यांना नियम पाळूनच परीक्षेची‎ तयारी करावी लागणार आहे. पहिल्या‎ टप्प्यात २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१‎ जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार‎ आहे.‎

शेवटच्या ५ प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल‎
बारावीत ७५ टक्के गुणांची अट ही पूर्वी होती. फक्त‎ कोरोनाकाळात त्यात सवलत दिली हाेती. ती आता यंदाच्या‎ परीक्षेत पुन्हा जैसे थे केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना‎ पूर्वीप्रमाणेच बारावीत ७५ टक्के गुण अनिवार्य असेल.‎ मेन्समध्ये एका विषयावर २५ प्रश्न विचारले जातात. आता‎ शेवटचे ५ प्रश्न विचारले जातील. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग‎ नसेल. न्युमेरिकल प्रश्न असतील. त्यात इटिंगर टाईप‎ असतील. त्या प्रश्नांची उत्तरे ० ते ९ दरम्यान असतील.‎

काैन्सिलिंगच्या माध्यमातून प्रवेश‎
यंदा देशभरातील ११२ संस्थांच्या ५४,४७७ जागांवर जोसा‎ (Joint Seat Allocation Authority)‎ काैन्सिलिंगच्या माध्यमातून आयआयटी, एनआयटी‎ ट्रिपल आयटीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. विद्यार्थी‎ अॅडव्हान्स गुणांच्या आधारे आयआयटी, मेन्सच्या‎ गुणांवर एनआयटी, ट्रीपल आयटी आणि सेंट्रल‎ फंडेडसहित अन्य इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकतात.‎ त्यासाठी आता बारावीत ७५ टक्के गुण आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...