आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध बतावण्या करून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणारी आंतरजिल्हा गुन्हेगार टोळी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. त्यांच्या ताब्यातून एकूण ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख ७० हजार रुपये किमतीचे २ मोटारसायकली असा एकूण ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी दिली.
२० नोव्हेंबर २०२० रोजी या घटनेतील फिर्यादी उर्मिला भोगी (रा भारतीय विद्यापीठ जवळ) या व त्याचे पती, सून यांच्यासह घरी असताना दोन अनोळखी इसम घराच्या अंगणात आले. तुमच्या दूधवाला भोसले आमचा पाहुणा आहे. आम्ही तुमच्यासाठी दुधाचा चिक खरवस आणला आहे अशी थाप मारली. उर्मिला गोगी या घरात जाऊन त्यांनी दुधाचे भांडे घेऊन बाहेर आल्या. दुधाचा चिक घेण्यासाठी खाली वाकले असताना दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्या वजनाचे सोन्याचे दागिने इसका मारून तोडून नेले. विजापूर नाका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, सहा. पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे व त्यांच्या पथकातील पथकाने गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने घटनास्थळ व आजूबाजूचा परिसर तसेच शहराबाहेरील जाणाऱ्या रस्ते येथील सीसीटीव्ही फुटेज यांचा बारकाईने तपास करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल एक वर्षांनी या पथकाने या गुन्ह्यातील आरोपी अशोक उर्फ डॉन नामदेव गंगावणे (वय ३२), अशोक उर्फ कट्ट्या विश्वनाथ गंगावणे (वय २९), अनिल रघुनाथ बिरदवडे (वय ३४ रा . सर्वजण बांदलवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडे अधिक तपासात त्यांनी शहरातील जोडभावी पेठ, फौजदार चावडी पोलिस ठाणे या परिसरात तसेच बार्शी शहरात दोन असे एकूण 5 गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपी विरोधात पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, भोर व शिरूर पोलिस ठाणे, सातारा जिल्ह्यातील शिरवळ आदी ठिकाणी जबरी चोरीचे व बतावणी करून सोन्याचे दागिनेचा अपहार केल्याची 14 गुन्हे दाखल आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.