आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार मेळावा‎:बार्शीच्या शिवाजी काॅलेजतर्फे‎ 5 जानेवारीला रोजगार मेळावा‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास रोजगार व‎ उद्योजकता विभाग आणि बार्शीचे‎ शिवाजी महाविद्यालय यांच्या‎ संयुक्त विद्यमाने बार्शीत गुरुवारी‎ दीनदयाळ उपाध्याय रोजागार‎ मेळावा होणार आहे. यात सोलापूर‎ औद्योगिक परिसरातील एकूण‎ दहापेक्षा जास्त कंपन्यांत एकूण‎ १३०० पेक्षा जास्त पदे भरली जातील.‎ सर्व रिक्तपदे किमान दहावी, १२‎ वी, पदवीधर, बी.ए., बी.कॉम,‎ डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी.एस्सी,‎ एम.एस्सी, फिटर, वेल्डर,‎ इलेक्ट्रिशियन, आय.टी.आय. आदी‎ विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी‎ याद्वारे विविध संधी आहेत.

नोकरी‎ इच्छुक उमेदवारांनी‎ www.rojgar.mahaswaya‎ m.gov.in या संकेतस्थळावर‎ नोंदणी करावी. व पाच जानेवारी‎ रोजी शिवाजी महाविद्यालय,‎ शिवाजी नगर, बार्शी येथे‎ मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.‎ अधिक माहितीसाठी‎ (०२१७२९५०९५६) या दूरध्वनीवर‎ अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य‎ विकास, रोजगार व उद्योजकता‎ मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क‎ चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा,‎ असे आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...