आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिषाने फसगत:बँकेत नोकरीची थाप, बदल्यात घेतले 12 लाख! पण केला विश्वासघात

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीआयसीआय या खासगी बॅंकेत नोकरीला लावताे असे सांगून एका तरुणाचा विश्वास संपादन करुन 12 लाख 23 हजार 500 रूपये उकळुन नोकरी न देता फसवणूक केली.या प्रकरणात संशयित भामट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, गणेश भानुदास गरड (वय ३२, रा. रानमसले, ता. उत्तर साेलापूर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अविनाश गौरीशंकर बोराळे (रा. कोरवली, ता. मोहोळ) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. फसवणुकीची घटना 17 मार्च 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत उज्जीवन स्मॉल फायनान्स कार्यालयात घडली.

आरोपी होता कंपनीत नोकरीला

आरोपी अविनाश बोराळे हा सोलापूरच्या सिटी पार्क येथील उज्जीवन स्मॉल फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. त्याने गणेश गरड यास जास्तीत जास्त एफ.डी. काढण्यास सांगून 18 लाख 16 हजार 500 रूपये घेतले. यातील 12 लाख 15 हजार रूपये परत केले. उर्वरित 6 लाख 1 हजार 500 रूपये स्वत:च्या फेडरल बँकेत खात्यावर जमा करून घेतले.

आणखी मागितले सहा लाख

यानंतर नोकरी लावतो असे सांगून 6 लाख 22 हजार रूपये घेतले. एफ डीची रक्कम व ही रक्कम अशी एकूण 12 लाख 23 हजार 500 रूपयांची फसवणूक केली. या रकमेची वेळोवेळी मागणी केली असता ही रक्कम परत केली नाही.

बातम्या आणखी आहेत...