आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत 21.45 टक्के मुलांना नोकरी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधि विभागाची नॅकसमोर माहिती

प्रतिनिधी। सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून रोजगाराभिमूख अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर दिला आहे. २०१५ ते २०२० पर्यंत सोलापूर विद्यापीठाच्या अधि विभागातील २१.४५ टक्के मुलांना रोजगार किंवा नोकरी मिळाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नॅक समितीसमोर ही माहिती सादर केली.

रोजगाराच्या संधी

सोलापूर विद्यापीठ स्थापन होवून १८ वर्षाचा कालावधी झाला आहे. दोनवेळा नॅक मूल्यांकनही झाले आहे. विद्यापीठास बी प्लसचा दर्जा आहे. आठरा वर्षांत विद्यापीठातून पास होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. विद्यापीठ अधि विभागातही संशोधनावरही विशेष भर दिला जातो. विद्यापीठात एकुण ११ विभाग आहेत. प्रविष्ट होणाऱ्या मुलांची संख्या व नोकरीत असलेल्या मुलांची संख्यांची तुलना केली असता नोकरीतील प्रमाण कमी आहे. मात्र, कौशल्य विकासांतर्गत रोजगाराभिमूख अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत आहेत. विद्यापीठ अधि विभागातील पत्रकारीता विभाग, ग्रामीण विकास व व्यवस्थापनाच्या, रसायनशास्त्र, संगणक विभागाच्या मुलांना रोजगाराच्या संधीही चांगल्या मिळत आहेत.

300 हून अधिक जणांना पीएचडी

विद्यापीठात मागील सन २०१५-६१ पासून अधिभागातून एकुण १८२७ मुलं उत्तीर्ण झालेली आहेत. काही मुलं विविध कंपन्या,संस्था, काहीजण सहा.प्राध्यापक, तर काही संशोधन करीत आहेत. विद्यापीठातील ८१ जण सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेत. ७७ मुलांनी संशोधनासाठी नोंदणी केली आली. विद्यापीठ स्थापन झाल्यापासून ३००हून अधिक जणांना पीएचडी पदवी घेवून नोकरीत लाभ घेत आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमाचा लाभ

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाकडे अधि विभागातील जे मुलं नोकरीत आहेत, त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे माहिती नॅकला सादर केली होती. नोकरीत असलेल्यांची संख्या जास्त आहे. कौशल्य विकासांतर्गत विद्यापीठ अधि विभाग व संलग्न महाविद्यालयात एकुण १३५ अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. त्यामध्ये अधि विभागात २१ अभ्यासक्रम आहेत. पॅरामेडिकल अभ्यासक्रमातून शंभर टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. संगणक,अर्थशास्त्र व जैवीय संख्याशास्त्र मधील ६० टक्के मुलं रोजगारामध्ये आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमातून नोकरी मिळतेच.

बातम्या आणखी आहेत...