आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सिद्धेश्वर मंदिरासमोरील जुजबी अतिक्रमण काढले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने बुधवारी सिद्धेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण जुजबी स्वरूपात काढले. सिद्धेश्वर मंदिर प्रवेशद्वार ते मार्केट पोलिस चौकी मार्गावर रस्त्याच्या एका बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचा वाहतुकीस अडथळा होत असल्याने अतिक्रमणाच्या मुद्द्या चर्चेत आला. त्यावर महापालिकेने जुजबी अतिक्रमण काढले.अतिक्रमणबाबत सकल लिंगायत महासमितीने पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.

त्यावर पालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने बुधवारी जुजबी प्रमाणात कारवाई करून अतिक्रमण काढले. पालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख प्रदीप थडसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रस्त्यावर असलेले फर्निचर ताब्यात न घेता इतर किरकोळ साहित्य ताब्यात घेऊन गेले.

बातम्या आणखी आहेत...