आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना अटकेत:कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटकेत

माळशिरस8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा सदाशिवनगर येथे कनिष्ठ अभियंता सुमित गुलाबराव साबळे (वय २७) यांनी शेतामधील स्वतंत्र वैयक्तिक डीपीसाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव व लाच प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाच प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. माळशिरस ठाण्यात गुन्हा नोंदवणे सुरू होते.

तक्रारदाराने शेतामध्ये स्वतंत्र वैयक्तिक डीपी बसवला असून, त्यास २५ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड कार्यालय सदाशिवनगर यांच्याकडून चार्जिंग परवानगी मिळाली अाहे. तेव्हापासून सदर डीपी चालू झाला होता. परंतु, त्यास कोणतेही मीटर बसवले नसल्याने तक्रारदारांना सदर डीपीचे अद्यापपर्यंत कोणतेही बिल आलेले नव्हते. साबळे यांनी तक्रारदार यांना सदर विद्युत डीपीसाठी नवीन मीटर बसवण्यास सांगून मीटर बसवल्यानंतर यापुढे तक्रारदार यांना स्वतंत्र बिल येईल, असे सांगितले. डीपी चालू केल्यापासून ते आजपर्यंत वापरल्याचे कोणतेही बिल न आकारण्याकरिता १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.