आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:कोंडी सोसायटीच्या पहिल्या महिला चेअरमन ठरल्या ज्योती भोसले

सोलापूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोंडी, ता. उत्तर सोलापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी प्रथमच महिलेस संधी मिळाली. ज्योती लक्ष्मण भोसले यांची चेअरमनपदी व व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत निळ यांची अविरोध निवड झाली. निवडीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या वेळी रावसाहेब शिंदे, विक्रम काकडे, ओंकार शिंदे, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर मोरे, रमेश शिंदे, निवृत्ती जाधव, रघुनाथ शहापूरकर, योगेश वाघमारे, सोमनाथ भोसले, गोविंद पाटील, पिंटू निंबाळकर, महेश सुतार, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते. भोगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील भोसले आणि व्हाइस चेअरमनपदी रेवण घोडके यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या वेळी उपसरपंच गोरख भोसले, नितीन भोसले, समाधान साबळे, विलास आदलिंगे, दादाराव घोडके, मारुती घोडके, अनिल घोडके, कांताबाई घोडके, संगीता भोसले, शिवाजी चव्हाण, लक्ष्मण भोसले, शिवाजी भोसले, रामा सोमवंशी, सचिव ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.

नराेटेवाडी विकास रत्न दिलीपराव माने विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भीमाशंकर उंबरे आणि व्हाइस चेअरमनपदी महिंद्र खटके यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालकपदी उत्तरेश्वर नरोटे, गणपती भगत, संदीपान कोळेकर आदींची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...