आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपस्थित श्रोत्यांकडून दाद:एकपात्री नाट्यातून साकारला कबीर

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजकल्याण केंद्र रंगभवन चौक येथे संत कबीर यांच्यावर आधारित ‘मी संत कबीर बोलताेय’ हा एकपात्री नाट्य प्रयोग अभिनेते कुमार आहेर यांनी सादर केला. सादर करीत असताना संपूर्ण कबिरांचा इतिहास श्रोत्यांसमोर ठेवला. या कार्यक्रमाचे संयोजन कलावंत आशुतोष नाटकर व प्रफुल्ल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विश्व विक्रमाचे मानकरी व सलग ५६ मिनिटे समई नृत्य करणारे व परभणीचे मधू कांबळे यांनी समई नृत्य सादर केले. उपस्थित श्रोत्यांकडून दाद मिळवली.

जातपात, धर्मभेद, रूढी, कर्मकांडावर काडीमात्र विश्वास नव्हता. हिंदू अगर इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर, विसंगतींवर त्यांनी कडाडून हल्ले केलेत. तत्कालीन समाजाबाबतचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म असून, त्यांच्या निर्भय, साहसी दर्शन त्यांच्या काव्यरचनेतून घडते. संत कबीर हे सत्य, विज्ञानावर आधारित लेखन करीत होते. लिखाणामुळे ते जगामध्ये प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानल्याने त्याचा विज्ञानवादी दृष्टिकोन जगासमोर येण्यास मदत झाली, असे प्रतिपादन अभिनेते कुमार आहेर यांनी व्यक्त केले यावेळी प्रा. एम. आर. कांबळे, अशोक भालेराव, बाळासाहेब वाघमारे, प्रशांत राजे आदींसह नाट्य कलावंतांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...