आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वजित कदम यांची ईडीमार्फत चौकशी:कदमांना भाजपची ऑफर दिलेलीच नाही : जगताप

सांगली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले हे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी हे नेते भाजपत प्रवेश करण्याचा आभास निर्माण करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील भाजपच्या कोणत्याही नेत्याला ऑफर दिलेली नाही. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पक्षाच्या अनेक नेत्यांचा विश्वजित कदम यांना भाजपमध्ये घेण्यास तीव्र विरोध असल्याची प्रतिक्रिया जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन्ही आमदार असलेल्या विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यांची ईडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर येत्या काही दिवसात उपोषण करणार आहेत. असे सांगून जगताप म्हणाले की, सासरे अविनाश भोसले व त्यांच्या पत्नीच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. या चौकशीतून विश्वजित कदम यांच्यापर्यंत धागेदोरे निश्चितपणे येतील त्यामुळे भयभीत झालेले कदम व त्यांचे समर्थक स्वत: भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...